Widget HTML Atas

chava kadambari pdf file free download

शिवाजी सावंत लिखित छावा ही मराठी कादंबरी आहे. आजच्या इंटरनेटच्या युगात मला आणि माझा टीम ला असे दिसून आले की, छावा कादंबरी पीडीफ मध्ये मोफत डाउनलोडींग साठी खूप जण शोधत आहेत. म्हणून हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे कि छावा एका सिंगल क्लिक वर उपलबद्ध करून दयावी . या कादंबरीचे सर्व माहिती अधिकार/ कॉपीराइट्स अर्थात स्वतः लेखकाचे असून आम्ही फक्त ज्ञानप्रसारा साठी छावा कादंबरी मराठी मध्ये मोफत डाउनलोडींग ला देत आहोत.

छावा कादंबरी प्रस्तावना

संभाजी राजांचा जन्म १४ मे, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला.  संभाजी महाराज हे शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांचा जीवनकाळ जन्मापासूनच बिकट आणि अतिशय कठीण होता पण तरीही सर्व परिस्थितींशी सामना करत हे शूर पुरुष अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान बनले.

शंभूराजे जन्मता च सईबाईंच्या निधनामुळे आईच्या दुधास मुकले आणि त्यांची दूध आई बनल्या पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ. संभाजीराजे अत्यंत चाणाक्ष असल्यामुळे त्यांनी  राजकारणातील बारकावे भराभर आत्मसात केले. लहान वयातच काही घटना मुळे त्यांना मोघलांकडे राहावे लागले, अवघ्या ९ व्या वर्षी आग्ऱ्याहून सुटकेचा थरार त्यांनी अनुभवला, सुरक्षिततेसाठी पसरवण्यात आलेल्या स्वतःचा निधनाच्या खोटया अफवेमुळे त्यांना बराच काळ भूमिगत राहावे लागले. इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणात तरबेज झाले होते.

राज्याभिषेकानंतर १२ दिवसांत झालेल्या जिजाबाईच्या निधना मुळे संभाजीराजे मायेने पोरके झाले. शिवाजी महाराज सतत स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले असताना, अण्णाजी दत्तों, सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. हेच ते कारण होते ज्यामुळे तरुण संभाजीराजांचे दरबारातील अनुभवी प्रधान मंडळाशी मतभेद होऊ लागले. यामुळे पुढे वेगवेगळी कारणे देत सोयराबाई आणि दरबारातील मानकऱ्यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा अप-प्रचार सुरू केला.

उत्तर दिग्विजय मोहीमे साठी छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगझेब चा मुलगा सेहजादा मुअजम याला आपल्या बाजूने केले. या साठी ते गनिमीकाव्याने दिलेरखानाच्या छावणीत जाऊन राहिले. त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांची ताईसाहेब राणू अक्का ही होत्या. ३ एप्रिल १६८० ला  शिवाजी महाराजही त्यांना सोडून गेले. महाराजांच्या अंतिम क्षणी सोयराबाईकडून केले गेलेले कटकारस्थाने वाचून तर वाचक स्तब्ध होऊन जातात. नंतर संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करण्यात आले. पण सरनोबत हंबीरराव मोहित्यांनी संभाजीराजांची बाजू घेतली आणि १६ जानेवारी इ.स. १६८१ रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. या सर्व सुख-दुखांच्या प्रसंगात शंभूपत्नी येसूबाईनी दिलेल्या साथीचे सुंदर वर्णन छावा मध्ये केले आहे.

संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने खूप लढे दिले, मराठ्यांच्या झुंझारपणाची कितीतरी उदाहरणे संभाजीराजांच्या कारकिर्दीत झाली. संभाजीराजांनी केलेल्या लढायांचे पुस्तकात केलेले वर्णन वाचकाना प्रेरित करतात.

गणोजी शिर्के, संभाजीराजांचे सख्खे मेहुणे हे काही गावांच्या वतनांसाठी औरंगजेबाला सामील झाले आणि सरदार मुकर्रबखान यांने केलेल्या संगमेश्वरावराच्या हल्ल्यात संभाजी राजे आपले प्रिय मित्र कवी कलश सहित पकडले गेले आणि त्या क्षणापासून त्या दोघांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला.
संभाजीराजांचा मृत्यूपर्यंतच्या ४० दिवसांचे अतिशय हृदय पिळवून टाकणारे वर्णन असलेली शेवटची २० पाने वाचताना वाचकाच्या मनात संताप आणि डोळ्यांत अश्रू भरून येतात. ही निघ्रुण हत्या मार्च ११, इ.स. १६८९ रोजी भीमा - इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे करण्यात आली. पण इतक्या अत्याचारानंतरही संभाजीराजे औरंगजेबासमोर नमले नाहीत आणि यातच औरंजेबाचा पराभव सिद्ध झाला.

छत्रपती संभाजीराजे उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते. त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. संभाजीराजांचे सल्लागार/ मित्र असलेले कवी कलश यांनी मरेपर्यंत आणि कठीण प्रवासातही संभाजीराजांची साथ सोडली नाही.

वाचकहो, तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून छावा कादंबरी मोफत डाउनलोड करू शकता. छावा वाचून झाल्यावर आपले अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद!

Source: http://shivcharitrabybabasahebpurandare.blogspot.com/p/chava-book-in-marathi-pdf-free.html

Posted by: aubreybergmanne0205437.blogspot.com